
परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रमुख विजय चौथाईवाले यांचे अमृत आख्यान कार्यक्रम
गडचिरोली : नागपूर भारतीय जनता पार्टीच्या परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रमुख विजय चौथाईवाले यांचे अमृत आख्यान भारताची परराष्ट्रनीती या विषयावरील वैचारिक बैठकीचे आयोजन संस्कृती सेलिब्रेशन सभागृह तरुण भारत कार्यालय, रामदासपेठ, नागपूर येथे करण्यात आले होते. याप्रसंगी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी बैठकीत उपस्थिती दर्शविली. यावेळी प्रमोद बोरावार, श्रीकांत भृगवार तसेच अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होते.



