गोंदियाविदर्भ

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात युरेशियन पाणमांजराची नोंद

गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वार्षिक व्याघ्र गणना सुरू आहे. त्यासाठी प्रकल्पाच्या गाभा व बफर क्षेत्रात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत. त्यात दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या युरेशियन पाणमांजराची कोका वनपरिक्षेत्रात पहिली छायाचित्रणात्मक नोंद झाली आहे.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प व संलग्न भूप्प्रदेशात या युरेशियन ऑटर (युरेशियन पाणमांजर) या प्रजातीचा पहिलाच छायाचित्रणात्मक पुरावा आहे. चॅम्पियन व सेठ यांच्या भारतीय जंगलांच्या वर्गीकरणानुसार हे क्षेत्र उष्णकटीबंधीय शुष्क पानझडी वन या वर्गात मोडते. निरोगी उभयचर पर्यावरणाचे सूचक म्हणून काम करून गोड्या पाण्यातील आणि किनारी परिसंस्थेत समतोल राखण्यात पाणमांजर महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतात पाणमांजराच्या तीन प्रजाती आढळतात. तिन्ही प्रजाती वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२, अनुसूची १ अंतर्गत संरक्षित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button