गडचिरोलीविदर्भ

आपत्ती व्यवस्थापन जनजागृती आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद

एनडीआरएफ नागपूर पथकाची प्रभावी सादरीकरणे

गडचिरोली : राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), नागपूर यांच्यावतीने गडचिरोली जिल्ह्यात १ एप्रिल ते ११ एप्रिल २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन जनजागृती व सराव कार्यक्रमाचा दुसरा दिवस आज यशस्वीपणे पार पडला. याअंतर्गत जिल्हा नियोजन समिती सभागृहात सकाळी १०.३० वाजता आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींना आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध पैलूंवर एनडीआरएफ च्या नागपूर पथकाकडून सखोल प्रशिक्षण देण्यात आले. DRR (Disaster Risk Reduction) शब्दावली, आपत्ती व आणीबाणी परिस्थिती, धोके, आपत्तीचे प्रकार, घटना प्रतिसाद प्रणाली यांसारख्या संकल्पनांपासून सुरुवात करून, भूकंप, भूस्खलन, पूर, त्सुनामी, चक्रीवादळ, विज पडणे अशा नैसर्गिक आपत्तींचे व्यवस्थापन, तसेच BLS (Basic Life Support), कृत्रिम श्वासोच्छवास तंत्र, choking, इमर्जन्सी लिफ्टिंग व हलवण्याच्या पद्धती, फायर सेफ्टी, जैविक, रासायनिक व आण्विक आपत्ती, गर्दी नियंत्रण, प्राथमिक उपचार, बँडेजिंग, स्ट्रेचर वापर अशा प्रत्यक्ष उपयुक्त बाबींचा समावेश होता.

प्रशिक्षणार्थींना आगीचे प्रकार व आग विझवण्याच्या तंत्राचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटानंतर उद्भवणाऱ्या आगीला कसे आटोक्यात आणावे, याचे प्रात्यक्षिकाने उपस्थितांना अत्यंत उपयुक्त ज्ञान मिळाले.

कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे, एनडीआरएफचे पोलीस निरीक्षक ब्रिजेशकुमार यादव, तहसीलदार सुरेंद्र दांडेकर, तहसीलदार (संगा.यो.) मोहनिश शेलवटकर, नायब तहसीलदार संगीता धकाते, नायब तहसीलदार ओसिन मडकाम यांची उपस्थिती लाभली.

या प्रशिक्षणात चामोर्शी, धानोरा, आणि गडचिरोली तालुक्यातील महसूल, पोलीस, आरोग्य व महावितरण विभागांचे बचाव पथक, स्थानिक पोलिस दल, मंडळ अधिकारी, तलाठी, आपदा मित्र, तसेच जिल्हा कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमात सहायक महसूल अधिकारी स्वप्निल माटे, आपदा मित्र चंद्रशेखर मोलंगुरवार, कल्पक चौधरी, अजित नरोटे आणि मयूर किन्नाके यांची देखील उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button