गडचिरोलीचंद्रपूरविदर्भ

वाघाच्या हल्ल्यात जखमी तरुणास माजी खा. नेते यांनी दिला मदतीचा हात

गडचिरोली : जयंत राजेश्वर जुमळे (वय २२) रा. तळोधी बा. ता. नागभीड जि. चंद्रपूर हा तरुण २९ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास गुरे चारत असताना वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. तळोधी बाळा येथील (चारगांव चक) शेतशिवारात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक झेप घेत त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. जखमी अवस्थेत त्याला तत्काळ उपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती स्थिर झाल्यावर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, मात्र पोटाच्या व कमरेच्या दुखापतीमुळे हालचालींमध्ये त्रास होत असल्याचे निदर्शनास आले.

याची माहिती अशोक कोहपरे व जखमी जयंत जुमळे यांनी गडचिरोली येथे जाऊन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांना दिली. त्यांनी तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयातील उप शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोलंकी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून जयंत जुमळे याच्या पुढील उपचारांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी डॉ. नेते यांनी जखमी व्यक्तीला आर्थिक मदतही प्रदान केली आणि तब्येतीची योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले. त्यांच्या सोबत रा. पारडी (बोंडगाव) येथील अशोक कोहपरे उपस्थित होते.

वाघाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, प्रशासनाने वन्यजीव सुरक्षा उपाययोजना प्रभावीपणे करावेत असे वक्तव्य माजी खा. डॉ. अशोक नेते यांनी यावेळी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button