गडचिरोलीविदर्भ

श्रीराम प्रभूच्या भागवत प्रबोधनातून ज्ञानाचं बोधामृत मिळते – माजी आ. कृष्णा गजबे

आरमोरी : श्रीराम चंद्रप्रभू यांच्या कार्याची महती तसेच कार्यातून ज्ञानाचे बोधामृत हे आपल्या सर्व नागरिकांना व जनतेला मिळते. या प्रभू श्रीरामाच्या नवमीच्या माध्यमातून आणि डोंगरगाव भुसारी येथे सुरू असलेल्या भागवत प्रवचनातून मोठ्या प्रमाणावर प्रभू श्रीरामच नामस्मरणचा जप सुरू असून या नामस्मरणाच्या माध्यमातून आपल्याला एक बोध अमृत मिळत आहेत आणि ह्या बोधा अमृताच्या माध्यमातून येथील तरुण मंडळी सुद्धा सुसंस्कारित व्हावेत आणि भागवत प्रवचननाच्या माध्यमातून डोंगरगाव हे गाव पूर्ण भक्तिमय झाले असल्याचे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी केले.

4 एप्रिल रोजी डोंगरगाव येथील श्री श्रीराम देवस्थान डोंगरगावतर्फे आयोजित भागवत प्रवचनाच्या कार्यक्रमावेळी माजी आमदार कृष्णा गजबे यांचा डोंगरगाव वासियांच्या तसेच श्रीराम मंदिर देवस्थानाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव नंदू पेटेवार, तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रा. दौलत धोटे, देवस्थान उत्सव समितीचे संतोष शेलोटे, लोचन ढोरे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष शेलोटे, नपुजी ढोरे, शंकर ठाकरे, हरीश राऊत, तलमले महाराज, नितेश धोटे उपस्थित होते.

या भागवत प्रवचन कार्यक्रमाच्या निमित्ताने 31 मार्च ते सहा एप्रिल पर्यंत हा भागवत सप्ताह सुरू असून दररोज सायंकाळी हरिपाठ याचा कार्यक्रम आणि येणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा व मार्गदर्शन सुरू असते. ६ एप्रिल रोजी प्रभू श्री रामचंद्र यांच्या श्रीराम नवमी जयंतीचा उत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होणार असून गोपालकाला आणि महाप्रसादाचे वितरण होणार आहेत. या कार्यक्रमावेळी महादेव श्रीराम मंदिर देवस्थान टेकडी येथे भव्य जत्रा सुद्धा आयोजित करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षीसुद्धा भव्यदिव्य असा हा कार्यक्रम डोंगरगाव वासियांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी महाप्रसादासाठी सगळ्यांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे संचालन लोचन ढोरे यांनी केले. त्यानंतर हरिपाठाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button