
जिल्हा महामंत्री योगिता पिपरे यांची उपस्थिती
गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आणि श्रीराम नवमी मोठ्या श्रद्धा व उत्साहाने साजरी करण्यात आली. या प्रसंगी भाजपाचा ध्वज अभिमानाने फडकविण्यात आला. तसेच प्रभू श्रीराम, स्व. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, स्व. पं. दीनदयाल उपाध्याय, आणि स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांच्या कार्याचा स्मरणपूर्वक आशीर्वाद घेण्यात आला.
तद्नंतर संपूर्ण भारतात भारतीय जनता पार्टीचे दीड कोटी सदस्य झाल्याबद्दल आनंद उत्सव साजरा करण्यात आला व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मजबूत संघटन ऑनलाईन कार्यकर्ता संमेलन कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा थेट संवाद कार्यक्रम भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ऑनलाईन थेट प्रक्षेपणद्वारे पाहिला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाचवेळी १२ लाख कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधला व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी भाजपाचे जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, तालुका महामंत्री गोवर्धन चव्हाण, बंडू झाडे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, केशव निंबोड, विनोद देवोजवार, शहर अध्यक्ष कविता उरकुडे, निता उंदिरवाडे, अर्चना निंबोड वैष्णवी नैताम व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.



