
अनेक युवक-युवती व महिलांचा पक्षात प्रवेश
आष्टी : येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे व आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या आदेशान्वये, महिलाध्यक्ष डॉ. सोनल कोवे व सिनेट सदस्या तनुश्री आत्राम यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष पुष्पा बुर्ले यांच्या नेतृत्वात सदस्य नोंदणी व महिला पक्षप्रवेश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, अध्यक्ष म्हणून डॉ. सोनल कोवे तर प्रमुख पाहुणे म्हणून सिनेट सदस्या तनुश्री आत्राम उपस्थित होत्या. असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली. आष्टी येथिल अनेक युवक-युवती, महिलांनी पुष्पा बुर्ले व प्रणय बुर्ले यांच्या नेतृत्वात पक्षात प्रवेश केला.

मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, डॉ. सोनल कोवे व तनुश्री आत्राम यांनी पक्षाच्या ध्येय धोरणाबाबत माहिती समजावून सांगितली व पक्षाचे काम यापेक्षा अजून जोमाने वाढले पाहिजे याकरिता रीतसर मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस लौकिक भिवापुरे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. नोमेश जुवारे, जिल्हा संघटन सचिव डॉ. हेमंत भाकरे, महिला जिल्हा कार्याध्यक्ष सारिका गडपल्लीवार, गडचिरोली शहराध्यक्ष अमोल कुळमेथे, महिला तालुकाध्यक्ष रुपाली दुधबावरे, जिल्हासचिव कपिल बागडे, पुरुषोत्तम खेडेकर, बंडू मेश्राम, संदीप सोयाम, अशोक बुर्ले, रमेश बुर्ले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्व मान्यवरांचे तसेच कार्यकर्त्यांचे आभार व्येंकटेश बुर्ले यांनी मानले. त्यानंतर बुर्ले परिवारांनी तयार केलेल्या आष्टी येथील भव्य अशा कार्यालयाची सर्व मान्यवरांनी पाहणी केली व आमदार धर्मरावबाबा आत्राम सोबतच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करू असे आश्वासित करण्यात आले.



