गडचिरोलीविदर्भ

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ला ७ लाख १ हजारांची मदत; भाजप उद्योग आघाडी जिल्हाध्यक्षांचा पुढाकार

देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद; अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी कार्याला प्राधान्य

गडचिरोली : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या सामाजिक आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष आकाश अग्रवाल यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल ७ लाख १ हजार रुपयांची थेट मदत दिली आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या वतीने हा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला वाढदिवस सार्वजनिक उत्सव म्हणून साजरा न करता, जाहिराती, फलक, पुष्पगुच्छ किंवा हार यांवर अनावश्यक खर्च टाळून, तो निधी समाजोपयोगी कार्यांसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’स योगदान देण्यासाठी वापरण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या विधायक आवाहनाला प्रतिसाद देत, भाजपा उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष आकाश भाऊ अग्रवाल यांनी थेट ७ लाख १ हजार रुपयांची मदत देऊन समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. ही कृती त्यांच्या सामाजिक बांधिलकीची आणि जबाबदारीची उत्तम द्योतक आहे.

हा निधी सुपूर्द करताना सह-पालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. परिणय फुके, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार मिलिंद नरोटे, माजी आमदार कृष्णा गजबे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेश जेठाणी, भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष आकाश अग्रवाल आणि माजी नगरसेवक नरेश विठ्ठलानी हे देखील उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या या स्तुत्य उपक्रमामुळे समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण समोर आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button