गडचिरोलीविदर्भ

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा काँग्रेसचे ‘लॉलीपॉप-चॉकलेट’ वाटप आंदोलन

गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांनी आश्वासनांचे लॉलीपॉप दिल्याची काँग्रेसची टीका; युवक, महिला, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप

गडचिरोली : राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीने एका अभिनव पद्धतीने आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केवळ मोठी-मोठी आश्वासने (लॉलीपॉप) दिल्याचा आरोप करत, काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्क चॉकलेट-लॉलीपॉपयुक्त केक कापून नागरिकांना लॉलीपॉप व चॉकलेटचे वाटप केले.

जिल्हा काँग्रेस कमिटीने म्हटले आहे की, मुख्यमंत्री गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही, त्यांच्या आतापर्यंतच्या दौऱ्यांमध्ये त्यांनी कधीही जिल्ह्यातील युवक, महिला, शेतकरी आणि सामान्य नागरिकांशी थेट संवाद साधला नाही. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या नाहीत, तर फक्त मोठी-मोठी आश्वासने देण्याचे काम केले, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. या निषेधार्थ आणि मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे अनोखे आंदोलन करण्यात आले.

यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, आमदार रामदास मसराम, माजी जिप उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, शहराध्यक्ष सतीश विधाते, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा ऍड. कविता मोहरकर, कुरखेडा तालुका अध्यक्ष जीवन नाट, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, वडसा तालुका अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, कोरची तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, धानोरा तालुका अध्यक्ष प्रशांत कोराम, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, किसान सेल जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रेय खरवडे, सोशल मीडिया उपाध्यक्ष नंदु वाईलकर, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, माजी नगरसेवक रमेश चौधरी, शंकरराव सालोटकर, अनिल कोठारे, घनश्याम वाढई, विनोद लेणगुरे, प्रभाकर वासेकर, हरबाजी मोरे, जितेंद्र मूनघाटे, लालाजी सातपुते, दिवाकर निसार, प्रतिक बारसिंगे, योगेंद्र झंझाड, श्रीनिवास ताटपल्लीवार, सुरेश भांडेकर, महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष कल्पना नंदेश्वर, कविता उराडे, पौर्णिमा भडके, उत्तम ठाकरे, सुधाकर ठाकूर, रवींद्र पाल, सुशील शाह, बालू चापले, नागोराव उईके, प्रभाकर कुबडे, भूषण भैसारे, विनोद निकुरे, मेंगाजी कोडाप, निकेश कामिडवार, विजय लाड, सुरज भोयर, मनोज बोरकर, अनिल किरमे, संजू मेश्राम, देवा लोणबले, स्वप्नील बेहरे, जावेद खान, देवनाथ टेकाम, गणेश गावडे, राणू गावडे, उत्तम आतला, छबीलाल भाऊ, रपेंद्र नाईक, लक्ष्मण राना सह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button