
भीम जयंतीनिमित्त कुरूड येथे नाटकाचा कार्यक्रम
देसाईगंज : डॉ. आंबेडकर आंबेडकर यांच्या विचारांचा आणि कार्याचा उल्लेख करून तरुण पिढीने त्यांचा आदर्श समोर ठेवून प्रगतीकडे वाटचाल करावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधानाचा संदेश हा समतेचा, बंधुत्वाचा आणि न्यायाचा आहे. या मूल्यांचे जतन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन आमदार रामदास मसराम यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील कुरूड येथे विशेष नाटक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार रामदास मसराम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
कार्यक्रमाला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, क्षितीज उके, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, माजी उपसभापती नितीन राऊत, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे, जेसा मोटवानी, कृपाल मेश्राम, उपसरपंच गजानन सेलोटे, अविनास गेडाम, अरुण कुंभलवार,विलास पिलारे, प्रमोद मेश्राम, मनोज ढोरे, नामदेव वसाके, महेश वासनिक, डॉ. शेडमाके, श्रीराम मोहुर्ले, भीमराव शेंडे, राजरतन मेश्राम व गावकरी मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी उपस्थितांचे आभार मानले.



