गडचिरोलीविदर्भ

आरमोरी विधानसभा क्षेत्रातील सर्व मंडळ अध्यक्षांची अधिकृत घोषणा

देसाईगंज : भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये लाखो सदस्य नव्याने सहभागी झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी आरमोरी विधानसभा क्षेत्र जिल्हा गडचिरोली येथील चारही मंडळाच्या अध्यक्षपदासाठी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची घोषणा २१ एप्रिल रोजी संघटन पर्व अंतर्गत मंडल अध्यक्ष निवडीसाठी भाजपा वरिष्ठ पदाधिकारी यांच्या नेतृत्वात नेमणूक प्रक्रिया आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे करण्यात आली.

देसाईगंज मंडल (ग्रामीण) अध्यक्षपदी सुनील पारधी तसेच मंडल (शहर) अध्यक्षपदी सचिन खरकाटे, आरमोरी मंडल अध्यक्षपदी पंकज खरवडे, कुरखेडा मंडल अध्यक्षपदी चांगदेव फाये, कोरची मंडल अध्यक्षपदी सदाराम नरोठी यांची नियुक्ती करण्यात आली.

आरमोरी विधानसभा क्षेत्रातील तालुका अध्यक्षपदी नेमणुक झाल्याबद्दल उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नवनियुक्त अध्यक्षपदावर नेमणूक झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी लोकसभा निवडणूक प्रमुख किसन नागदेवे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आ. कृष्णा गजबे, भाजपा जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, भाजपा जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, भाजपा महिला मोर्चा जिल्हा महामंत्री सीमा कन्नमवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेश जेठानी, भाजपा महिला मोर्चाचे जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, भाजपा महिला मोर्चाचे जिल्हा सचिव भूमिका बर्डे, शालू दंडवते, माजी बालकल्याण सभापती रोशनी पारधी, जिल्हा महामंत्री प्रीती शंभरकर, जिल्हा सचिव सचिन वानखेडे, महामंत्री वसंता दोनाडकर, मोहन पाटील गायकवाड, गोपाल उईके, अश्विनी कांबळे, योगेश नागतोडे, सदानंद ठाकरे, जोतू तेलतुंबडे, केवळराम झोडे, कुलदीप आमले, हिरालाल शेंडे, कैलास पारधी, शंकर पारधी, चक्रधर नाकाडे, हरीश डांगे, सरपंच धनंजय तिरपुडे, अजय राऊत, भास्कर बनसोड, हेमाताई कावळे, शामराव अलोणे, प्रमोद झीलपे, अरुण राऊत, आदित्य मिसार, अंचित मिसार, विलास पारधी, रोशन ठाकरे, संदीप राऊत आदी यांच्यासह पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button