गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

दारूच्या नशेत अधिकारी कर्तव्यावर ; जाब विचारल्यावर म्हणाले…

उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील घटना

कुरखेडा : स्थानिक उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील अधिकारी नीमतानदार 1 हे 7 ऑक्टोबर रोजी कर्तव्यावर असताना दारुच्या नशेत आढळून आल्याने खळबळ उडाली. संजय भोयर असे दारुच्या नशेत असलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, कुरखेडा येथे उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय असून सदर कार्यालयात सोमवारी काही शेतकरी कामानिमित्त भोयर यांच्याकडे गेले असता भोयर हे अती मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आले. यावेळी प्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष भेट दिली असता संजय भोयर हे दारुच्या नशेत आढळून आले. यासंदर्भात काही शेतकऱ्यांकडून त्यांना जाब विचारण्यात आला असता त्यांनी कारण देत मी दौऱ्यावर असतो, मला बाहेर फिरावे लागते त्यामुळे मी दारु पितो असे विधान त्यांनी केले आहे.

अधिकारी हे कर्तव्यावर असताना चक्क दारुच्या नशेत आढळून आल्याने संजय भोयर यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी जोर धरत असून गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असूनही जिल्ह्यातील अधिकारी वर्गही दारुच्या आहारी गेल्याचे यातून दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button