गडचिरोलीविदर्भ

पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली

कारगिल चौकात कार्यक्रम ; शहरातील मान्यवरांचा सहभाग

गडचिरोली : येथील कारगिल चौकातील स्मारकासमोर मेणबत्त्या पेटवून पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी दहशतवाद्यांचा निषेध करत पाकिस्तान मुर्दाबादचे नारे देण्यात आले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील नागरिकांनी हजेरी लावून मृतांना श्रद्धांजली वाहिली.

दहशतवादी हल्ल्यात निष्पाप 28 पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर, कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने “शांततेसाठी जमुया” या टॅगलाईनसह एक भावनिक श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमात खा.डॉ. नामदेव किरसान, विश्व हिंदू परिषदेचे सुशिल हिंगे, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. कविता मोहरकर, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विश्वजित कोवासे यांच्यासह शहरातील विविध संघटनांचे सदस्य, युवक व महिला, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व सामान्य नागरिकांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात शहीद पर्यटकांच्या स्मृतीसाठी मौन पाळण्यात आलं आणि उपस्थितांनी देशात शांतता, एकता आणि सद्भावना नांदावी यासाठी संकल्प घेतला. “शांततेसाठी जमूया, एकतेचा उजेड पसरवुया” या घोषवाक्याने संपूर्ण परिसर भारावून गेला होता.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळाचे उदय धकाते, सुनील देशमुख, डॉ. बिडकर, राजू पुंडलिककर, संदीप कांबळे, मोतीराम हजारे, संजय गद्देवार, महेंद्र मसराम, रुपेश सलामे, प्रकाश धकाते, सुचिता धकाते, निलिमा देशमुख, वनिता भांडेकर, भाऊ चन्नावार, राजू साळवे, श्रीकांत पतरंगे, शरद ब्राम्हणवाडे, चंद्रशेखर भडांगे, विजय साळवे, विजय सुरपाम, राज डोंगरे, अंकित कुळमेथे, अजय सिडाम, अजय सुरपाम, विवेक वाकडे, महादेव कांबळे अशा अनेकांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button