गडचिरोलीविदर्भ

भाजपा केवळ सत्तेसाठीची संस्था नसून राष्ट्रसेवेचे विराट साधन – माजी खा. डॉ. अशोक नेते

गडचिरोलीत भाजपची विस्तारित बैठक ; ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला जनआंदोलन बनवण्याचा निर्धार

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी, गडचिरोलीतर्फे पोटेगाव रोडवरील यमुना लॉन येथे ‘सेवा पंधरवाडा-२०२५’ व जिल्हा कार्यकारिणीची विस्तारित बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीत ‘आत्मनिर्भर भारत संकल्प अभियाना’वर मार्गदर्शन करताना माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी भारतीय जनता पार्टी ही केवळ सत्तेसाठीची संस्था नसून राष्ट्रसेवेचे विराट साधन असल्याचे म्हटले.

डॉ. नेते यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. ते म्हणाले, “पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत नवा इतिहास घडवत आहे आणि आत्मनिर्भर भारत हे त्या परिवर्तनाचे प्रमुख साधन आहे.” त्यांनी ‘लोकल फॉर व्होकल’ या मंत्राचे महत्त्व सांगितले आणि MSME, स्टार्टअप्स, शेती आणि डिजिटल उपक्रमांमुळे भारताने जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनण्यास मदत केल्याचे म्हटले.

ते पुढे म्हणाले, “आत्मनिर्भर भारत हे केवळ आर्थिक अभियान नसून, ते राष्ट्रनिर्माणाचे आंदोलन आहे. रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांचे सक्षमीकरण आणि तंत्रज्ञानात नवोन्मेष हेच याचे मूलभूत स्तंभ आहेत.” त्यांनी कार्यकर्त्यांना गावोगावी आणि घराघरांत ‘स्वदेशी’चा संदेश पोहोचवण्याचे आवाहन केले.

या बैठकीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर ‘सेवा पंधरवाडा’ कार्यक्रम आयोजित करण्याची माहिती दिली. या बैठकीला विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, ज्येष्ठ नेते अरविंद पोरेड्डीवार, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, डॉ. नामदेवराव उसेंडी, नागपूरचे माजी आ. सुधाकर कोहळे, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस रेखा डोळस, कि.मो.प्र. सचिव रमेश भुरसे, माजी जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष मोती कुकरेजा, अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष बबलुभाई हुसैनी, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन कोडवते, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, गोविंद सारडा, सदानंद कुथे, गिता हिंगे, डॉ. चदा कोडवते, डॉ. संगिता रेवतकर, माजी जि.प. अध्यक्ष प्रशांत कुतरमारे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता भांडेकर यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीतून कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली असून, गडचिरोली जिल्ह्यात ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला जनआंदोलनाचे स्वरूप देण्याचा निर्धार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button