गडचिरोलीविदर्भ

राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह

पोलीस उपअधीक्षक सुजित पांडे, पोलीस उपनिरीक्षक मंगलसिंग डाबेराव आणि पोलीस उपनिरीक्षक अजय वाल्मिक यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर 

देसाईगंज : पोलीस दलात उत्कृष्ट सेवा आणि प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलीस कर्मचारी/अधिकारी यांना पोलीस महासंचालक यांच्यातर्फे दिला जाणारा पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र तालुक्यातील विसोरा येथील महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 13 चे पोलीस उपअधीक्षक सुजित पांडे, पोलीस उपनिरीक्षक मंगलसिंग डाबेराव आणि पोलीस उपनिरीक्षक अजय वाल्मिक यांना जाहीर करण्यात आला आहे.

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 13 विसोरा कॅम्प येथील गट आस्थापनावरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना महाराष्ट्र पोलीस दलात मानाचे समजले जाणारे पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडून 1 मे ला महाराष्ट्र दिनाच्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात देण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button