
325 रुग्णांची तज्ञांकडून तपासणी व उपचार
देसाईगंज : संत निरंकारी मंडळ, शाखा वडसा (देसाईगंज) च्या वतीने आज संत निरंकारी सत्संग भवन, आरमोरी रोड, देसाईगंज येथे रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यांत आले. यात डॉ. पुरुषोत्तमजी आरोरा, M.D हृदयरोग तज्ञ, हुबली, कर्नाटक, डॉ. मनीष मोतीलाल जेठानी, M.S.सर्जिकल ऑन्कोलाजी (कॅन्सर) मुंबई, डॉ. कंचन सच्चानन्दानी, M.S सर्जिकल गैस्ट्रोएंटरोलॉजी, मुंबई, डॉ. अंकिता केणी, मुंबई, डॉ. कु. प्रिया मोतीलाल नेठानी, पुणे, डॉ. कोसे, डॉ. गोरख सहारे, डॉ. सोहेल खान तसेच ग्रामीण रूग्णालयातील आरोग्य तपासनी कर्मचारी करिश्मा हर्षे, प्रयोगशाळा तंज, कु. ज्ञानेश्वरी दुधबडे, परिचारिका यांनी सक्रिय सहभाग घेवून आरोग्य निदान शिबीरात आलेल्या 325 रुग्णांची तपासणी व उपचार पूर्ण केला.

शिबीराचे उद्घाटन आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते किशन नागदेवे, झोनल इंचार्ज, संत निरंकारी मंडळ यांचे अध्यक्षतेखाली व आसाराम निरंकारी, संयोजक, हरिषकुमार निरंकारी, क्षेत्रीय संचालक, सेवादल, माधवदास निराकरी, मुखी कुरखेडा व सर्व तज्ञ डॉक्टर यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
उद्घाटन पर संबोधनात आ. गजबे यांनी मानवसेवेचे व्रत घेवून निस्वार्थ भावनेने सेवाकार्य हे निरंकारी मिशनची ओळख असल्याचे त्यांनी नमूद करून मिशनच्या रक्तदान, स्वच्छता अभियान, वृक्षारोपन इ. सेवाकार्याची मुक्त कंठाने प्रशंसा केली.
रोगनिदान शिबीरासाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. औषधीचे मोफत वितरण करण्यांत आले व सर्वासाठी महाप्रसादाची ही व्यवस्था करण्यांत आली होती. शिबीराला यशस्वी करण्यांसाठी सेवादलचे सर्व स्त्री- पुरुष सदस्यांनी गणवेषात सेवा दिल्या.
कार्यकमाची प्रस्तावना हरिष निरंकारी तसेच संचालन नानक कुकरेजा व आभार प्रदर्शन पुरुषोत्तम डेंगानी यांनी केले.
यावेळी सर्व तज्ञ डॉक्टरांना निरंकारी मिशनचे काही प्रकाशन पुस्तके भेट करण्यात आली. शिबीराला यशस्वी केल्याबद्दल व सहकार्याबद्दल किशन नागदेवे, झोनल इंचार्ज व संत निरंकारी मंडळाचे वडसा शाखेने सर्वांचे आभार व्यक्त केले आहे.



