गडचिरोलीविदर्भ

देलनवाडीत ‘जल शुद्धीकरण व शीतकेंद्र प्लांट’ कार्यान्वित

माजी आ. गजबे यांच्या हस्ते लोकार्पण

आरमोरी : तालुक्यातील मौजा देलनवाडी ग्रामपंचायत येथील नागरिकांना आता शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध झाली आहे. प्रधानमंत्री खनिज विकास निधीतून मंजूर करण्यात आलेला “जल शुद्धीकरण व शीतकेंद्र प्लांट” (ATM R.O. PLANT) चे काम जलद गतीने पूर्ण झाले असून १६ मे रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.

या लोकार्पण सोहळ्याला माजी आमदार कृष्णा गजबे यांच्यासह जिल्हा सचिव नंदू पेट्टेवार, सरपंच प्रियंका कुमरे, मिनेश्वरी जांभुळे, माणिक पेंदाम, प्रकाश लेनगुरे, रामहरी चौधरी, दिलीप कुमरे, रोहिदास कुमरे, विजय नेवारे, कबिरादास कुंभलकर, राहुल धाइत तसेच ग्रामपंचायतीमधील सर्व पदाधिकारी, कर्मचारी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देलनवाडीतील नागरिकांसाठी शुद्ध आणि थंड पाण्याची सोय उपलब्ध झाल्यामुळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. या प्रकल्पाच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button