क्राईमगडचिरोलीविदर्भ

कत्तलीसाठी जाणाऱ्या तीन जनावरांची सुटका

चारचाकी वाहनासह १ लाखांचा मुद्देमाल जप्त ; तिघांवर गुन्हे दाखल

आरमोरी : आरमोरी पोलिसांनी तालुक्यातील जोगीसाखरा मार्गावर केलेल्या कारवाईत कत्तलीसाठी मिनी मेटॅडोरमधून अवैधरीत्या वाहतूक केली जात असलेल्या तीन जनावरांची सुटका केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जनावरांसह चारचाकी वाहन असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार, १२ मे रोजी करण्यात आली.

एजाज अब्बस कुरेशी (वय ४५) आणि अलीम शेख (वय ३१) (दोघेही रा. कमलानगर, ता. देसाईगंज) तसेच रेहान नौशाद कुरेशी (वय २५, रा. गडचिरोली) अशी आरोपींची नावे आहेत.

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना जोगीसाखरा मार्गे कत्तलीसाठी जनावरांची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी तातडीने याची माहिती आरमोरी पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी जोगीसाखरा मार्गावर नाकेबंदी केली. नाकेबंदी दरम्यान, एमएच/ ४० बीजी ९२६३ क्रमांकाच्या एका टेम्पोची तपासणी केली असता, त्यामध्ये दोन म्हशी आणि एक गाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी जनावरांची किंमत ५५ हजार रुपये आणि वाहतुकीसाठी वापरलेले चारचाकी वाहन असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरमोरी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईदरम्यान बजरंग दलाचे कार्यकर्ते लोकेश माकडे, धनपाल ढोरे, अमनसिंह गहेरवार, तुषार खापरे आणि सुनील ढोरे उपस्थित होते. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button