आरोग्यगडचिरोलीविदर्भ

गडचिरोलीत पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

​गडचिरोली : “दोन थेंब जिंदगीचे… पोलिओला हरवूया, देशाला जिंकवूया!” या घोषवाक्याला साद देत सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासन गडचिरोली यांच्या वतीने रविवारी महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे ‘पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा’ जिल्हास्तरीय शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

​या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि बालकांना पोलिओ डोस पाजण्याचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, आमदार डॉ. मिलिंद नरोटे आणि गडचिरोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर  यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

​यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके आणि जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. माधव शिंदे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते उपस्थित लाभार्थी बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजून या राष्ट्रीय मोहिमेची अधिकृत सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रशासनातर्फे जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयाच्या प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस नक्की पाजावा, असे नम्र आवाहन सर्व पालकांना करण्यात आले.

​या महत्त्वपूर्ण जिल्हास्तरीय मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी महिला व बाल रुग्णालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी, नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी तसेच डॉ. सचिन हेमके, डॉ. पंकज हेमके, डॉ. अमित साळवे, डॉ. प्रशांत आखाडे, पी.एच.एन. प्राती, मृणाली रामटेके आणि गडचिरोली नगरपरिषदेचे सन्माननीय नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ​या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद मोडक यांनी केले, तर आभार डॉ. अमित साळवे यांनी मानले. या मोहिमेला गडचिरोली शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button