
चिचोली येथील घटना ; शिजवलेले व कच्चे मांस जप्त
भद्रावती : तालुक्यातील चिचोली येथे बेकायदेशीरपणे शिकार संरक्षित वन्यप्राणी घोरपडीची करून, त्याचे मांस शिजवून खाण्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींवर वनविभागाने शुक्रवारी (दि. २६) आरोपींना अटक केली. आरोपींकडून घोरपडीचे कच्चे व शिजवलेले मांस तसेच शिकारीसाठी वापरण्यात आलेली लोखंडी काती जप्त करून वनगुन्हा दाखल केला आहे. नीलेश उत्तम राहुलगडे (३३), निखिल गणपत श्रीरामे (३०) आणि संतोष गुलाब कातकर (५२, सर्व राहणार चिचोली, ता. भद्रावती) अशी आरोपींची नावे आहेत.
चिचोली येथे काही इसमांनी घोरपडीची अवैध शिकार करून तिचे मांस घरी आणल्याची माहिती मिळताच विभागीय वन अधिकारी राजन तलमले व सहायक वनसंरक्षक (तेंदू) विकास तरसे यांच्या मार्गदर्शनात पथकाने ही कारवाई केली.



