गडचिरोलीविदर्भ

चामोर्शीत अखिल तेली समाज महासंघ आणि संताजी सृष्टीची राज्यव्यापी बैठक ; ओबीसी जनगणना व संघटना बांधणीवर चर्चा

अखिल तेली समाज महासंघाच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी प्रभाकर वासेकर तर गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी विनोद खोबे यांची निवड

चामोर्शी : मार्कंडेश्वर देवस्थान येथे अखिल तेली समाज महासंघ आणि संताजी सृष्टी यांची गडचिरोली-चंद्रपूर राज्यव्यापी बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत अखिल तेली समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अड. प्रा. डॉ. रमेश पिसे आणि संताजी सृष्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर रायमल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

डॉ. रमेश पिसे यांनी आपल्या भाषणात भारतातील सर्व तेलगू समाज बांधवांनी संघटित होण्याची गरज व्यक्त केली. विविध संघटना, मंडळे आणि कार्यकारिणी समित्यांमध्ये विभागलेल्या बांधवांना आपल्या हक्कांसाठी एकत्र येणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी सांगितले. यासाठी देश, राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर तेली बांधवांना एकत्र आणून अखिल तेली समाज महासंघाची मजबूत कार्यकारिणी तयार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या राज्यव्यापी बैठकीत अखिल तेली समाज महासंघ आणि संताजी सृष्टीच्या सेवाग्राम येथील बैठकीची माहिती आणि पुढील कार्यवाहीचे नियोजन. केंद्र सरकारने ओबीसी जात जनगणने संदर्भात घेतलेल्या निर्णयाबाबत जनजागृती आणि कृती कार्यक्रम आखणे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांवर विचारविमर्श. संघटना बांधणी आणि नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर चर्चा. माजी खासदार रामदास तडस यांच्याबाबत घडलेल्या घटनेचा निषेध आणि चर्चा. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरील आगामी चित्रपटाची माहिती. जगद्गुरू तुकोबारायांचे शिष्य संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०१ व्या जयंतीनिमित्त चर्चा. या प्रमुख विषयांवर चर्चा झाली.

बैठकीत अखिल तेली समाज महासंघाच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी प्रभाकर वासेकर यांची, तर गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी विनोद रामदासजी खोबे यांची निवड करण्यात आली. तसेच, इयत्ता १० वी च्या परीक्षेत ९६% गुण मिळवून तेली समाजाचा गौरव वाढवणाऱ्या लोंढोली येथील विद्यार्थी समर मनोज खोबे याचा रोख रक्कम, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या सभेला अखिल तेली समाज महासंघ आणि संताजी सृष्टीचे अनेक मान्यवर उपस्थित होते. यात ऍड. प्रा. डॉ. रमेश पिसे, ज्ञानेश्वर रायमल, यशवंत सायरे, प्रभाकर वासेकर, नागोराव कोठारे, संजय नासरे, संतोष खोब्रागडे, रवींद्र उमाठे, विलास काळे, कृष्णा बेले, विनोद खोबे, गजानन भांडेकर, राहुल नैताम, राजू धोडरे, रोहिदास कुणघाडकर, सुनीता काळे, मनोज खोबे, दादाजी बारासागडे आणि इतर तेली समाज बांधवांचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button