गडचिरोलीविदर्भ

अमरावती येथे धान खरेदी केंद्र सुरू ; सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा

हर्षवर्धनबाबा आत्राम यांच्या हस्ते उद्घाटन 

सिरोंचा : तालुक्यातील शेतकरी बांधवांना उन्हाळी धान विकण्यासाठी योग्य पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांना आपला धान कमी दरात ठेकेदारांना व व्यापाऱ्यांना विकावा लागत होता. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करत आंदोलन छेडले होते. या मागणीची दखल घेत, महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या निर्देशाने अखेर अमरावती येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.

डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून धान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश दिले होते, ज्याला आता मूर्त स्वरूप आले आहे.

राजे डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या धान खरेदी केंद्राचे उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गडचिरोली व चिमूर क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लुरी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सतीश गंजीवार, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती किष्ठामूर्ती रिकुला, सत्यनारायण मेरगा, सय्यद सालार, जुगूनु शेख, कमलाकर ताटीकोंडावर, पुजारी व्यंकटेश, रमेश मानेम, पप्पाभाई, तिरुपती मडावी, आकाश राऊत व धान केंद्राचे सचिव यांच्यासह अनेक गावकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या उन्हाळी धानाला योग्य भाव मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्यास मदत होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button