चंद्रपूरविदर्भ

अवैध रेती वाहतूक करणारा ट्रक जप्त

पोंभुर्णा येथे महसूल विभागाची कारवाई 

चंद्रपूर : पोंभूर्णा तालुक्यातील थेरगाव येथील अंधारी नदी पात्रातून अवैध रेतीची तस्करी करणाऱ्या एका ट्रकचा महसूल विभागाच्या दक्षता पथकाने थरारक पाठलाग करून त्याला पकडले. ही कारवाई बुधवारी (दि. १७) दुपारी ११ वाजताच्या सुमारास चेक पोंभूर्णा येथे करण्यात आली. या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

तालुका गौण खनिज दक्षता पथक बुधवारी गस्तीवर असताना, थेरगाव नदीघाटावरून रेती भरून येणारा एमएच २७ / बीएक्स ८०२७ क्रमांकाचा ट्रक संशयास्पदरीत्या येताना दिसला. पथकाने ट्रकची चौकशी करण्यासाठी चालकाला थांबण्याचा इशारा केला, मात्र चालकाने गाडी न थांबवता पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पथकाने तत्काळ ट्रकचा पाठलाग करून त्याला चेक पोंभूर्णा येथे अडवले. पकडलेल्या ट्रकची झडती घेतली असता, चालकाकडे रेती वाहतुकीचा कोणताही अधिकृत परवाना किंवा रॉयल्टीची पावती आढळली नाही. अवैध रेती तस्करी होत असल्याचे स्पष्ट झाल्याने पथकाने रेतीने भरलेला ट्रक जप्त केला. हा ट्रक पोंभूर्णा तहसील कार्यालयाच्या परिसरात लावून त्याचा पंचनामा करण्यात आला आहे. हा ट्रक अमरावती येथील असल्याची माहिती आहे.

ही धडक कारवाई तहसीलदार मोहनिश शेलवटकर, नायब तहसीलदार रामकृष्ण उईके, दीपाली आत्राम, मंडळ अधिकारी सुरेंद्र चिडे, दिनकर शेडमाके, सुनील चौधरी, तलाठी आसिफ पठाण आणि धनलाल भोयर यांनी पार पाडली. ट्रक मालकाचे नाव अद्याप समजू शकले नसून, या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button