गडचिरोलीविदर्भ

१० जून रोजी काटोल येथे शेकापचा विदर्भस्तरीय मेळावा

जयश्री जराते आणि भाई शामसुंदर उराडे यांच्या नेतृत्वात गडचिरोलीतून शेकडो कार्यकर्ते होणार सहभागी

गडचिरोली : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) राज्यभरात जोरदार तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून विभागवार कार्यकर्ता मेळावे आयोजित करण्यात येत असून, विदर्भातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एक महत्त्वपूर्ण मेळावा मंगळवार, १० जून रोजी नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी गडचिरोली शेकापचे शेकडो कार्यकर्ते महिला नेत्या जयश्री जराते आणि भाई शामसुंदर उराडे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

या मेळाव्याला शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील, माजी आमदार भाई बाळाराम पाटील, आमदार भाई डॉ. बाबासाहेब देशमुख, खजिनदार भाई आर्किटेक्ट अतुल म्हात्रे, कार्यालयीन चिटणीस भाई ॲड. राजेंद्र कोरडे, पॉलीट ब्युरो सदस्य भाई प्रा. एस. व्ही. जाधव, सहचिटणीस भाई बाबासाहेब देवकर, भाई राहुल देशमुख, चिटणीस मंडळाचे सदस्य भाई रामदास जराते, ॲड. मानसीताई म्हात्रे, भाई डॉ. अनिकेत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या मेळाव्यात पक्षनेतृत्वाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील शेकापची रणनीती, संभाव्य आघाड्या, संघटनात्मक नियुक्त्या, उमेदवारांची निवड आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांवरील भविष्यातील आंदोलने याविषयी सविस्तर भूमिका मांडण्यात येणार आहे.

गडचिरोली शेकापच्या कार्यकर्त्यांनी मंगळवार, १० जून रोजी सकाळी ६.०० वाजता वेळेवर आणि मोठ्या संख्येने शेकाप जिल्हा कार्यालय येथे उपस्थित राहावे, असे आवाहन गडचिरोली शेकापचे पदाधिकारी भाई चंद्रकांत भोयर, भाई रमेश चौखुंडे, शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गोविंदा बाबनवाडे, महामार्ग बाधित आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर गव्हारे, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शोएब पटेल, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामदास आलाम, भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डंबाजी भोयर, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शर्मीश वासनिक, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष गुड्डू हुलके, महिला जिल्हाध्यक्ष कविता ठाकरे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अभिलाषा मंडोगडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button