गडचिरोलीविदर्भ

देसाईगंजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक ; माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा सत्कार

अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश

देसाईगंज : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देसाईगंज येथील पटेल लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार राजे धर्मरावबाबा आत्राम यांचा सत्कार करण्यात आला, तसेच तालुक्यातील विविध पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवी वासेकर होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये आरमोरी विधानसभेचे माजी आमदार व राष्ट्रवादीचे नेते रामकृष्ण मडावी, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती नाना नाकाडे, प्रदेश सरचिटणीस युनूसभाई शेख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष समय्या पसूला, युवक जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, महिला जिल्हा कार्याध्यक्ष वृषाली भोयर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष आरिफ भाई पटेल, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष चेतन पेंदाम, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मोटवानी, शैलेश पोटवार, विधानसभा अध्यक्ष किशोर तलमले, कार्याध्यक्ष सुनील नंदनवर, चोपचे माजी सरपंच आत्माराम सूर्यवंशी, मिलिंद डोंगरे, तालुका अध्यक्ष संजय साळवे, शहर अध्यक्ष लतीफ शेख, तालुका कार्याध्यक्ष मनोज तलमले आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी आगामी निवडणुकीसंदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट केली. “आगामी निवडणूक युतीसोबत लढण्याबाबत बैठक घेऊन समाधानकारक निर्णय झाले तर युतीसोबत लढू, नाही तर वेळ पडल्यास स्वातंत्र्य लढू,” असे उद्गार त्यांनी काढले. सर्व कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून एकजुटीने कामाला लागण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्यांच्या उपस्थितीत तालुक्यातील विविध पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. धर्मरावबाबा आत्राम यांनी पक्षाचे दुपट्टे घालून त्यांचे पक्षात स्वागत केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेश सरचिटणीस युनूस शेख यांनी केले, तर संजय साळवे यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले. शहर अध्यक्ष लतीफभाई शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी राधेशाम बाराय्या, संतोष धारगावे, विजय पिल्लेवान, किशोर चुनचुवार, प्रमोद दहिवले, जितू गेडाम, द्रौपदी सुखदेवे, सपना आत्राम, ममिता आडे, कल्पना वासनिक, अजय शूरकार, ठाकरे, अफजल शेख, मुससू खान, मुशा शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button