गडचिरोलीविदर्भ

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार ; आ. धर्मरावबाबा आत्राम यांचे संकेत

जिल्हा परिषदेवर एकहाती सत्तेचे उद्दिष्ट : अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश; विजयासाठी जनसंपर्कावर भर देण्याच्या सूचना

गडचिरोली : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) स्वबळावर निवडणुका लढण्यास सज्ज झाला आहे. जिल्हा परिषदेच्या किमान ३२ जागा जिंकून नगर परिषद आणि पंचायत समित्यांवर एकहाती सत्ता आणण्याचे उद्दिष्ट ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे निर्देश दिले आहेत.

आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली शहर व तालुक्याची आढावा बैठक तसेच कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बैठकांचा सपाटा लावला आहे. त्यानंतर याच महिन्यात आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी स्वतः १२ ही तालुक्यांमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या, ज्यामुळे इतर राजकीय पक्षांमध्ये धास्ती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या जिल्हाभर दौऱ्यांमुळे आणि राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्यावरील जनतेच्या प्रेमामुळे प्रभावित होऊन गडचिरोली नगर परिषदेचे माजी अध्यक्ष प्रमोद वैद्य, शिवणी गावचे सरपंच किरण ताटपल्लीवार, माजी जिल्हा परिषद सदस्या वैशाली किरण ताटपल्लीवार, आदिवासी टायगर सेना महिला जिल्हाध्यक्ष लीना कोकोडे, काँग्रेस पक्षाचे विधानसभा सचिव विवेक रामटेके, युवा नेते गिरीश खाडिलकर, अल्पसंख्यांक विभागाचे सागिर शेख, अब्दुल ईमरान शेख, आरिफ शेख, शारीक शेख, सामाजिक कार्यकर्ता प्रफुल धरणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी पक्षाचे दुप्पटे घालून त्यांचे स्वागत केले.

गडचिरोली तालुका अध्यक्ष विवेक बाबनवडे, तालुका समन्वयक योगेश नांदगाये, ज्येष्ठ नेते फईम काझी, गडचिरोली शहर अध्यक्ष अजय कुंभारे, गडचिरोली शहराध्यक्ष अमोल कुळमेथे, गडचिरोली महिला विधानसभा अध्यक्षा सुषमा येवले, गडचिरोली शहर अध्यक्षा प्रीती कोवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षातील आणि इतर संघटनांमधील पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांनी येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केला.

आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळावर २३ जागा निवडून आणून जिल्हा परिषदेची सत्ता कशी काबीज केली होती, याची आठवण करून दिली. त्याचप्रमाणे यावेळी देखील जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने सकारात्मक वातावरण असल्याचे ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना चार महिने बाकी असून, या चार महिन्यात काहीही होऊ शकते. त्यामुळे युतीबाबत वेळेवर काय निर्णय होईल हे सध्या सांगता येत नसले तरी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पूर्ण ताकदीनिशी आगामी निवडणुका लढण्यास सज्ज राहावे, असे आवाहन धर्मरावबाबांनी केले.

जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना कानपिचक्या दिल्या. त्यांनी सांगितले की, उमेदवारांनी जनतेमध्ये जाऊन त्यांची कामे करावीत. लोकांची पोलीस स्टेशन, पंचायत समिती, तहसील ऑफिसची जी काही कामे असतील, शासनाच्या अनेक योजना असतील, त्या लोकांपर्यंत पोहोचवाव्यात. जनतेतून तुमचे नाव पुढे आले पाहिजे, तेव्हाच विजयाचा मार्ग सुकर होतो.

यावेळी माजी आ. डॉ. रामकृष्ण मडावी, प्रदेश सचिव युनूस शेख, युवक जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, मीडिया सेल जिल्हाध्यक्ष अक्षय बोरकर, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष चेतन पेंदाम, ओबीसी जिल्हाध्यक्ष संजय शिंगाडे, मयूर धकाते, हर्षवर्धन मडावी, युवा नेते आकाश मडावी, श्याम सपाटे, आशा मुळेवार, प्रसाद पवार, प्रमोद उमरगुंडावर, सुधीर मडावी, लोमेश धुडसे, रवी चौधरी, योगेश हुलके, विलास ठाकरे, प्रभाकर कोल्हेवार, प्रकाश डोईजड, सरचिटणीस रामदास पिपरे, पंचायत समिती प्रमुख सचिव मधुकर रेवाडे, कालिदास जराते, ऋषभ कुळमेथे, कृष्णा शेंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button