गडचिरोलीविदर्भ

चिंचगुंडी येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात; सिनेट सदस्य तनुश्री आत्राम यांची उपस्थिती

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे आवाहन

गडचिरोली : विदर्भात २३ जून रोजी सत्र २०२५-२६ ची शाळेची घंटा वाजली आणि नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात झाली. अहेरी तालुक्यातील चिंचगुंडी येथेही माजी मंत्री व आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी शाळा प्रवेशोत्सव उपक्रम मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख उद्घाटिका म्हणून गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री धर्मरावबाबा आत्राम उपस्थित होत्या.

सिनेट सदस्य तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी यावेळी शिक्षकांना विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाचे आवाहन केले. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे शाळेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि चिमुकल्यांशी संवाद साधला.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिंचगुंडीच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या शोभा पानेम होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच कमला आत्राम, उपसरपंच सुशीला कसूरवार, गटशिक्षणाधिकारी राजेंद्र टिचकुले, केंद्रप्रमुख विनोद पुसालवार, रापत्तीवार, शंकर पाने, राज आत्राम, चिन्ह पानेम, शंकर पाने, अंगणवाडी सेविका, भुरसे (शाळेतील मुख्याध्यापक), शिक्षक वृंद व कर्मचारी, तसेच गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रवेशोत्सवाने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button