गडचिरोलीविदर्भ

देसाईगंजमध्ये ‘एक पेड माँ के नाम’ अभियान: मातृत्वाचा सन्मान करत वृक्षारोपण

माजी आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते कोंढाळा येथील दत्त मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण

देसाईगंज : भारतीय जनता पार्टीच्या आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या वतीने आणि देसाईगंज मंडल ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने, मातृत्वाचा सन्मान करण्याच्या उदात्त हेतूने ‘एक पेड माँ के नाम’ अभियान राबवण्यात आले. या अभियानाअंतर्गत देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील दत्त मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.

शनिवार, २९ जून रोजी झालेल्या या कार्यक्रमात, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानाचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. या उपक्रमाचा मुख्य हेतू पर्यावरणाचे रक्षण करण्यासोबतच मातांच्या त्यागाचा आणि प्रेमाचा गौरव करणे हा आहे.

यावेळी भाजपचे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृक्षारोपण करून पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा संदेश यावेळी उपस्थित सर्वांना देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button