गडचिरोलीविदर्भ

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते ऋतुराज हलगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप

सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम ; पक्षाच्या विभागीय अध्यक्षा शाहीन हकीम यांची उपस्थिती

अहेरी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे युवा व सक्रिय नेते मा. ऋतुराज हलगेकर यांचा वाढदिवस अत्यंत सामाजिक जाणीवेने साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय, अहेरी येथे रुग्णांना फळांचे वाटप करून या दिवशी सेवा आणि मदतीचा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमाला पक्षाच्या विभागीय अध्यक्षा शाहीन हकीम यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती दर्शविली. ऋतुराज हलगेकर यांचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की, “आजच्या पिढीतील तरुणांनी ऋतुराजसारखे समाजकार्याच्या माध्यमातून जनतेच्या सेवेत उतरले पाहिजे. वाढदिवस साजरा करताना आनंदाबरोबर समाजासाठी काहीतरी सकारात्मक देण्याची ही भावना स्तुत्य आहे.”

कार्यक्रमाचे आयोजन अतिशय शिस्तबद्ध व नियोजनबद्ध रीतीने करण्यात आले होते. रुग्णालयातील सर्वच रुग्णांना फळवाटप करून त्यांच्या आरोग्याबद्दल विचारपूस करण्यात आली. उपस्थित रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनीही हा उपक्रम अत्यंत सकारात्मक आणि दिलासादायक असल्याचे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमात तालुकाध्यक्ष श्रीनिवास वीरगुनवार, ज्येष्ठ नेते श्रीनिवास चटारे, स्वप्निल श्रीरामवार, सुमित मोतकुरवार, अब्दुल रहेमान अब्दुल बाबू, संतोष येमुलवार, मूगमोडे ताई, गोबाडे यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button