
भंडारा : नेहरू वॉर्ड, कारधा येथे अवैधपणे सुरू असलेल्या गोमांस कत्तल आणि विक्री केंद्रावर कारधा पोलिसांनी धाड टाकून सुमारे ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक (पोउपनि.) सोरते यांना नेहरू वॉर्ड, कारधा येथील अजीम अजीज कुरैशी (वय ३८, रा. सौदागर मोहल्ला, अंसारी वॉर्ड, बैरागीवाडा, भंडारा, ह.मु. नेहरू वॉर्ड, कारधा) याच्या घरात अवैधपणे गोवंश मांस कापले जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोउपनि. सोरते यांनी आपल्या पोलीस पथकासह अजीम कुरैशी याच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी आरोपी घरात संगनमत करून गोवंशीय मांस कापत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून गोमांस: १८० किलो (किंमत ३६,०००/- रुपये), लाकडी ओंडका (कापण्यासाठी): किंमत २००/- रुपये, छोटे-मोठे छुरे (कापण्यासाठी): किंमत ३००/- रुपये, इलेक्ट्रिक वजन काटा (जुना): किंमत ३,०००/- रुपये, पांढऱ्या रंगाचा इलेक्ट्रिक फ्रीज: किंमत ८,०००/- रुपये, पांढऱ्या रंगाच्या २० प्लास्टिक पिशव्या: किंमत २०/- रुपये, हिरव्या रंगाचा प्लास्टिक टब: किंमत २००/- रुपये, रोख रक्कम (अंगझडतीत): १२०/- रुपये असा एकूण ४७,८४०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी आरोपी अजीम अजीज कुरैशी याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात अप क्र. ५८६/२०२५ कलम ३२५, ३(५) भादंवि सहकलम ५(सी), ९(ए) महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास कारधा पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, आणि पो.नि. सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. सोरते, पोहवा. साठवणे, मपोहवा. गाढवे, पो.स्टे. कारधा यांनी यशस्वीरित्या पार पाडली.



