कृषीगोंदियाविदर्भ

गोंदियात ‘कृषी दिवस’ उत्साहात साजरा; शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या उपस्थितीत कार्यक्रम ; आधुनिक तंत्रज्ञानावर भर

गोंदिया : जिल्हा परिषदेच्या वतीने आज गोंदिया येथे “कृषी दिवस” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी भूषवले, त्यांच्यासोबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश कानावडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश कानावडे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी उपस्थित लाभार्थी, शेतकरी व नागरिकांना कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच, शेतकऱ्यांनी अधिकाधिक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमात कृषी क्षेत्रातील सुधारणा, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आणि शाश्वत शेतीच्या दृष्टीने उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाला विविध भागांतून शेतकरी व हितधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button