गडचिरोलीविदर्भ

सिरोंचा वनविभागाचे नवे उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी रुजू

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत ; प्रलंबित वनहक्क दावे मार्गी लावण्याची मागणी

सिरोंचा : सिरोंचा वनविभागाचे उपवनसंरक्षक म्हणून एस. नवकिशोर रेड्डी यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. यापूर्वीच्या उपवनसंरक्षक पूनम पाटे यांची बदली झाल्याने हे पद रिक्त होते. रेड्डी यांच्या नियुक्तीनंतर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे कार्यालय गाठत सत्कार केला आणि त्यांचे अभिनंदन केले.

एस. नवकिशोर रेड्डी यांची कर्तव्यतत्पर आणि समाजभिमुख अधिकारी अशी ओळख आहे. त्यांनी पदभार स्वीकारताच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी सिरोंचा वन विभागामुळे तालुक्यात रखडलेली विकासात्मक कामे आणि प्रलंबित वनहक्क दावे यांवर चर्चा केली. ही प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याची मागणीही त्यांनी रेड्डी यांच्याकडे केली. यावर उपवनसंरक्षक रेड्डी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लूरी, माजी नगरसेवक रवी रालाबंडीवार, कंत्राटदार वेंकटेश पुजारी, रमेश मानेम, उपसरपंच नागराज गणपती, ताटीकोंडावार, सत्यनारायण चिलकामारी, हुसेन शेख, एम. डी. शानू आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नवनियुक्त उपवनसंरक्षकांच्या कार्यकाळात सिरोंचा वनविभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button