गडचिरोलीमहाराष्ट्रविदर्भ

मतदार यादीतील नावाची खात्री करा – सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी प्रशांत गड्डम यांचे आवाहन

कोरची : भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी अर्हता आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचे दुसरे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मतदारांनी मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करावी, असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत गड्डम यांनी केले आहे.

सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत गड्डम यांच्या अध्यक्षतेखाली कोरची तहसील कार्यालयात राजकीय पक्ष पदाधिकारी, सदस्य पदाधिकारी, नगर परिषद तसेच माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत २५ जुलै रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व विधानसभा मतदार संघ व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या स्तरावर प्राप्त दावे व हरकती स्वीकारुन निकाली काढल्यानंतर अंतीम मतदार यादी २० ऑगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

या पुनरिक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार २५ जून ते २४ जुलै पर्यंत पूर्ण पुनरिक्षण कार्यक्रमास मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे द्वारे प्रत्यक्ष घरोघरी भेट देवून पडताळणी, मतदान केंद्राचे सुसूत्रिकरण व पुर्नरचना व प्रमाणीकरण, मतदार यादी मतदार ओळख पत्रातील त्रुटी दुर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे, अस्पष्ट, अंधुक छायाचित्र बदलुन त्याऐवजी मतदारांकडुन योग्य छायाचित्र प्राप्त करुन मतदार यादीत सुधारणा करणे, तसेच विभाग व भाग भाग यांची नव्याने रचना, मतदान केंद्राच्या सिमांची पुनर्रचना, मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे, कट्रोल टेबल अद्यावत करणे, नमुना १ ते ८ तयार करणे, सोमवारी आधारित एकत्रित प्रारुप यादी तयार करण्यात आली.

तपशिल योग्य असल्याची खात्री करुण घ्या

२३ जानेवारी आणि ४ एप्रिल रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या अंतिम मतदार याद्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या ceo.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपल्बध आहेत. मतदाराने electoral.search.eci.gov.in या संकेतस्थळावर जाऊन यादीतील आपले नाव तपासावे सर्व तपशिल योग्य असल्याची खात्री करावी. दुरुस्ती असल्यास संबंधीत बीएलओकडे किंवा ऑनलाईन स्वरुपात नमुना ६ भरुन मतदार नोंदणी करता येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button