
अहेरी : तालुक्यातील छल्लेवाडा येथील रहिवासी अनिल मालय्या दुर्गे यांच्या आई मल्लूबाई दुर्गे यांच्या नुकत्याच झालेल्या दुःखद निधनामुळे दुर्गे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अंत्यविधीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर, अत्यंत गरीब असलेल्या या कुटुंबाला पुढील तेरवी कार्यक्रमासाठी मोठी आर्थिक अडचण भासत होती.
सोमवारी (दि. १७) अनिल दुर्गे यांनी काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांची त्यांच्या अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात भेट घेऊन कुटुंबाला भासत असलेल्या आर्थिक अडचणीबद्दल माहिती दिली. कंकडालवार यांनी दुर्गे कुटुंबाची अडचण त्वरित लक्षात घेऊन, त्यांना तेरवी कार्यक्रमासाठी आर्थिक मदत केली. कंकडालवार यांच्या या संवेदनशील मदतीमुळे दुर्गे कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पसरले आणि त्यांनी कंकडालवार यांचे मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी विलास बोरकर, गुलाब देवगडे, प्रभाकर दुर्गे, शंकर भसरकर, दिलीप दुर्गे, हणमंतु ठाकरे, करण कांबळे, दासू कांबळे, तेजराव दुर्गे, नवीन जनगम, अनमोल बोरकर आणि जगदीश कोंडागुर्ले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.



