
मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वामनराव वनमाळी यांच्या जयंतीनिमित्त अभिनव उपक्रम
आरमोरी : येथील स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्वर्गीय नसरुद्दीन पंजवानी वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि पर्यावरण विभागाने संयुक्तपणे ‘ एक पेड़ माँ के नाम ‘ हा उपक्रम राबवला. मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, स्वर्गीय वामनरावजी वनमाळी यांच्या जयंतीनिमित्त हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या उपक्रमांतर्गत महाविद्यालय आणि महाविद्यालयाच्या परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यामध्ये बेल, आंबा, पिंपळ, करंजी यांसारख्या रोपट्यांचा समावेश होता. या वृक्षारोपण कार्यक्रमात मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मनोज वनमाळी, तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी दीपक वनमाळी, अशोक वनमाळी, उमाकांत वनमाळी, हरिश्चंद्र बोंद्रे, दीपक बेहेरे, मयूर वनमाळी, निशांत वनमाळी, राजूभाऊ गारोदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मा. अद्दलवार सर, वत्सलाबाई स्कूल ऑफ स्कॉलर्सचे प्राचार्य कासार यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या वर्षीचा प्रेरणा पुरस्कार मा. मुरलीधर हेडाऊ यांनी प्रदान केला.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख डॉ. गजेंद्र कढव, प्रा. सुनंदा कुमरे आणि डॉ. वसंता कहाललकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. छगन मुंगमोडे, प्रा. डॉ. ज्ञानेश्वर ठाकरे, प्रा. डॉ. विजय गोरडे, प्रा. डॉ. नरेश बनसोड, प्रा. डॉ. कविता खोब्रागडे, प्रवीण प्रधान, सचिन ठाकरे यांनी सहकार्य केले.



