गडचिरोलीविदर्भ

जिल्हा काँग्रेसने केली जनसुरक्षा विधेयकाची होळी

विधेयकाच्या रद्दबातलतेसाठी राज्यपालांना निवेदन ; विधेयक लोकशाहीविरोधी आणि नागरिक स्वातंत्र्यावर गदा आणणारे असल्याचा काँग्रेसचा आरोप

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेले “महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४” हे अत्यंत अन्यायकारक, लोकशाहीविरोधी आणि मूलभूत नागरिक स्वातंत्र्यावर गदा आणणारे असल्याचा आरोप करत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीने शनिवारी (दि.१९)  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या विधेयकाची होळी केली. त्याचवेळी हे विधेयक तातडीने रद्द करण्याचे निर्देश सरकारला देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले.

काँग्रेसच्या मते, या विधेयकाच्या अंमलबजावणीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वैयक्तिक गोपनीयता आणि संविधानाने हमी दिलेले नागरी हक्क गंभीरपणे बाधित होण्याची भीती आहे. गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल, संवेदनशील आणि मागास जिल्ह्यातील जनतेवर अशा दडपशाही स्वरूपाच्या कायद्याचा विपरीत परिणाम होईल. स्थानिक कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि सामान्य नागरिक यांच्यावर अवाजवी पोलीस नियंत्रण येईल, तसेच विरोधी मत मांडणाऱ्या लोकांना अन्यायकारक कारवायांचा सामना करावा लागेल.

या विधेयकामुळे नागरिकांच्या संविधानिक हक्कांची पायमल्ली होणार असून, हे विधेयक लोकशाही मूल्यांना धरून नाही. यामुळे महाराष्ट्रात ‘पोलिसी राजवट’ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे काँग्रेसने निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे जनतेच्या भावना आणि लोकशाही मूल्यांचा विचार करता “महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४” तत्काळ रद्द करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, महिला अध्यक्ष ऍड. कविता मोहरकर, शहर अध्यक्ष सतीश विधाते, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश राठोड, प्रभाकर वासेकर, माजी नगरसेवक रमेश चौधरी, माजी जि. प. सदस्य विनोद लेनगुरे, घनश्याम वाढई, प्रतीक बारसिंगे, पुष्पलता कुमरे, आशा मेश्राम, अपर्णा खेवले, सुनिता रायपुरे, शालिनी पेंदाम, कविता उराडे, मालता पुडो, पौर्णिमा भडके, उत्तम ठाकरे, सुभाष कोठारे, सुरेश भांडेकर, योगेंद्र झंजाळ, उमेश आखाडे, जितेंद्र मुनघाटे, मिलिंद बारसागडे, जावेद खान, माजिद सय्यद, निखिल खोब्रागडे, श्रीनिवास ताटपल्लीवार, स्वप्निल बेहरे, सुधीर बांबोळे, गोपाल कविराज, चोकाजी बांबोळे, नृपेश नांदणकर, रमेश धकाते, प्रफुल अंबोरकर, जितेंद्र मुप्पीडवार, तोमदेव जुवारे, सुभाष कोठारे, नीलकंठ गेडाम, गोपाल कोमलवार, जोगुजी तुंकलवार, नामदेव वासेकर, लहुजी भांडेकर, नामदेव फावणवाडे, रवींद्र मडावी, रोहिदास अलाम, तुळशीराम बोबाटे, जोगुजी भोयर, रमेश मुनरतीवार, देवराव मोहुर्ले, राजेंद्र कुकडकार, सुभाष धाईत, जनार्धन तुंकलवार यांसह शेकडोच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button