गडचिरोलीविदर्भ

‘पक्षाची संघटना बळकट करा’ – एमआयएम प्रदेश सचिव समीर बिल्डर यांचे आवाहन

गडचिरोलीत कार्यकर्ता मेळावा ; आगामी निवडणुकीत अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्याचे उद्दिष्ट

गडचिरोली: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाने गडचिरोली शहरात भव्य कार्यकर्ता मेळावा घेऊन संघटना बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव समीर साजिद बिल्डर यांनी कार्यकर्त्यांना पक्ष संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले.

मेळाव्यापूर्वी महाराष्ट्र प्रदेश सचिव समीर साजिद बिल्डर, विदर्भ नेते शाहिद भाई रंगूनवाला, विदर्भ नेते कृष्णा जाधव आणि निसार अहमद साहेब यांचे इंदिरा गांधी चौकात ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी भव्य रॅली काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. ही रॅली संस्कृती लॉन येथे पोहोचल्यावर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी मान्यवरांनी पक्ष संघटना बळकट करून एमआयएम पक्षाने प्रत्येक समाजाच्या, विशेषतः सर्वसामान्य गोरगरिबांच्या समस्या सोडवायला प्रथम प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. आगामी निवडणुकीत एमआयएम पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागण्याचे आवाहन समीर साजिद बिल्डर यांनी केले. त्यांनी गडचिरोलीमध्ये लवकरच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची सभा घेण्याचे, तसेच एआयएमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असुदुद्दीन ओवैसी साहेब यांनाही गडचिरोली शहरात येण्याचे आमंत्रण देण्याचे वचन दिले.

यावेळी शाहिद  रंगूनवाला आणि कृष्णा जाधव यांनी गडचिरोलीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची स्तुती केली. जिल्हाध्यक्ष बाशिद शेख यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक समाजाचे कार्यकर्ते पक्षात जोडले गेले असल्याचे त्यांनी नमूद केले. मेळाव्यात तौसिफ शेख, मुजाहिद शेख, किरण सहारे, अयान कुरेशी, सलमान शाह, भैसारे, निजाम शेख, मारोती भोयर यांचा पक्षप्रवेश करण्यात आला.

यावेळी एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाशिद शेख, महिला जिल्हाध्यक्ष आयशा अली सय्यद, शगुफ्ता शेख, जया कोंडे, सरिता बावणे, शमीना शेख, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष दिलीप बांबोळे, सोशल मीडिया प्रमुख जावेद शेख, शाहरुख शेख, सिद्दीक मन्सूरी, साजिद शेख, रमजान शेख, जुबेर खान, अनिल संतोषवार आदी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button