गोंदियाविदर्भ

कचारगड आश्रमशाळेत ‘एक दिवस-एक कार्यक्रम’ अंतर्गत हिवताप व डेंग्यूवर प्रबोधन कार्यशाळा

सार्वजनिक आरोग्य विभागाचा उपक्रम; विद्यार्थ्यांनी कीटकांद्वारे पसरणाऱ्या आजारांची घेतली माहिती

गोंदिया : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, जून महिन्यात हिवताप प्रतिरोध महिना आणि जुलै महिन्यात डेंग्यू प्रतिरोध महिना साजरा करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अतिदुर्गम सालेकसा तालुक्यातील पिपरिया गावातील कचारगड माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेत २१ जुलै रोजी ‘एक दिवस-एक कार्यक्रम’ उपक्रमांतर्गत हिवताप व डेंग्यू या आजारांवर प्रबोधन कार्यशाळा संपन्न झाली. सालेकसा तालुका नियंत्रण पथकाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील आत्राम यांच्या कल्पक विचारातून हा उपक्रम राबवण्यात आला.

या कार्यशाळेत कीटकशास्त्रज्ञ नरेंद्र नागपुरे यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना प्रोजेक्टरद्वारे कीटकांपासून होणाऱ्या आजारांची कारणे आणि डासांचे जीवनचक्र अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. विद्यार्थ्यांना अ‍ॅनोफिलीस मादी, एडीस आणि क्युलेक्स इत्यादी कीटक ओळखण्यासंदर्भात माहिती देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये या आजारांबद्दल जागृती निर्माण होऊन त्यांनी उत्साहाने कीटकांबद्दल प्रश्न विचारले. कीटकशास्त्रज्ञ नागपुरे यांनीही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे अतिशय सभ्यतेने देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील आत्राम यांनीही यावेळी कीटकांपासून होणारे आजार, त्यांची लक्षणे आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांबद्दल मार्गदर्शन केले. आयुर्वेदीक पिपरिया येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल प्रसाद म्हैसकर यांनी घराच्या अंतर्गत आणि बाह्य भागांची नियमित स्वच्छता, तसेच नियमित हात धुणे व त्याच्या पद्धती याबाबत मार्गदर्शन केले.

कचारगड माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेतील “एक दिवस-एक कार्यक्रम” उपक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापिका चुटे, अधीक्षक जे. पी. पारधी, प्राचार्य एच. वाय. बनोथे व पी. बी. भांडारकर तसेच शिक्षकवृंद बोपचे, पी. बी. बोरकर, डी. बी. मोहरे, शिवंकर, कुंजम, एच. दसारिया, शिरसम, मच्छिरके, दम्हे, बुरकुडे, वैद्य, मानकर, एस. माचिरके, आर. डी. गजभिये, पी. आर. दोनोधे यांनी विशेष सहकार्य केले.

तसेच, तालुका आरोग्य सहाय्यक आर. डी. सेलोकर, प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसाचे आरोग्य सहाय्यक विनोद गणवीर, उपकेंद्र पिपरियाचे आरोग्य सेवक आकाशानंद देशमुख यांचे सह आश्रमशाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयी जागरूकता वाढण्यास मदत झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button