गडचिरोलीविदर्भ

कृषी वाहिन्यांना कमी दाबाचा वीज पुरवठा ; माजी आ. कृष्णा गजबे यांना निवेदन

शेतकऱ्यांची ही समस्या दूर करण्याची मागणी ; गजबे यांची अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा

देसाईगंज : तालुक्यातील कुरुड, कोंढाळा फिडरला कमी व्होल्टेज, तसेच तालुक्यातील अन्य गावांमध्ये कृषी वाहिन्यांना कमी दाबाचा पुरवठा होत असल्याने काही शेतकऱ्यांनी ही समस्या दूर करण्यासाठी माजी आ.कृष्णा गजबे यांना निवेदन सादर केले. त्यांनी लगेच वीज कंपनीच्या मुख्य अभियंत्यांशी फोनवर चर्चा करत तोडगा काढण्यास सांगितले.

देसाईगंजचे उपविभागिय अभियंता विखार यांच्याकडून माहिती घेतली असता ब्रम्हपुरी 132 सबस्टेशन येथून देसाईगंज तालुक्यात कमी दाब येत असल्यामुळे ही समस्या उद्भवल्याचे समोर आले. त्यामुळे माजी आ.कृष्णा गजबे यांनी चंद्रपूरच्या वरिष्ठ मेंटेनन्स अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा करून वीज पुरवठ्याचा दाब कसा वाढेल आणि लवकरात लवकर या भागातील कृषी पंपांना सुरळीत वीज कशी देता येईल याचे नियोजन करण्याची सूचना केली. त्यांनी ही समस्या दूर करण्यासाठी लवकर प्रयत्न करू असे सांगत लवकर ही समस्या सुटेल, असे आश्वासन दिले.

यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष सुनील पारधी, दौलत ठाकरे, अरुण राऊत, सुशील ढोरे, विकास पारधी, अमित ठाकरे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button