गडचिरोलीविदर्भ

राज्याचे मुख्य माहिती आयुक्त १ ऑगस्ट रोजी गडचिरोलीत; १०० अपीलांवर विशेष सुनावणी

जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी १० वाजता सुनावणीला होणार प्रारंभ

गडचिरोली : माहितीच्या अधिकाराखाली दाखल करण्यात आलेल्या द्वितीय अपीलांवर तात्काळ निर्णय घेण्यासाठी राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांची गडचिरोली जिल्ह्यामध्ये विशेष सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार, १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ही महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे.

राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठामार्फत ही सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. यावेळी नागपूर खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त गजानन निमदेव हे देखील उपस्थित राहणार असून, जिल्ह्यातील विविध सार्वजनिक प्राधिकरणांशी संबंधित सुमारे १०० द्वितीय अपील प्रकरणांवर सुनावणी घेतील.

या विशेष सुनावणीमुळे प्रलंबित अपील प्रकरणांवर प्रभावी निर्णय घेऊन नागरिकांना माहिती अधिकाराच्या अंमलबजावणीत न्याय मिळवून देण्याचा उद्देश आहे. राज्य माहिती आयोगाच्या उपसचिव रोहिणी जाधव यांनी संबंधित द्वितीय अपीलकर्त्यांनी तसेच संबंधित सार्वजनिक प्राधिकरणांचे अधिकारी/प्रतिनिधींनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button