गडचिरोलीविदर्भ

गोंडवाना विद्यापीठात ‘भारतीय इतिहास लेखन: मध्य प्रांतातील जनजातीय योगदान’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन

५ व ६ ऑगस्ट रोजी होणार परिसंवाद ; पद्मश्री जगेश्वर यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या इंग्रजी विभाग आणि आदिवासी अध्यासन केंद्रातर्फे “भारतीय इतिहास लेखन: मध्य प्रांतातील जनजातीय योगदान” या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद, नवी दिल्ली, यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम ५ व ६ ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या नवीन सभागृहात होणार आहे.

हा परिसंवाद जनजातीय नायक भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादाचे उद्घाटन ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली तर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, अधिष्ठाता, मानवविज्ञान विद्या शाखा डॉ. श्याम खंडारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या प्रसंगी पद्मश्री जगेश्वर यादव, अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमचे युवा प्रमुख वैभव सुरंगे, तसेच डॉ. चित्तारंजन भोई, डॉ. श्याम कोरेटी आणि जनजातीय कार्यकर्ते डॉ. देवाजी तोफा यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

दोन दिवसांच्या या परिसंवादात बिरसा मुंडा, भारतीय इतिहास लेखन, मध्य प्रांतातील जनजातीय योगदान, छत्तीसगडमधील बीरहोर जनजातीचे योगदान, आणि आदिवासी संशोधन यांसारख्या विविध विषयांवर सत्रे आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. हा परिसंवाद विद्यार्थी, संशोधक आणि शैक्षणिक तज्ज्ञांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. या परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन परिसंवाद समन्वयक प्रा. विवेक जोशी (इंग्रजी विभाग प्रमुख) आणि डॉ. वैभव मसराम (समन्वयक, आदिवासी अध्यासन केंद्र) यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button