गडचिरोलीविदर्भ

वृक्षलागवडीच्या कामाची माहिती तात्काळ अद्ययावत करा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ अभियानांतर्गत ४० लाख वृक्ष लागवडीचा आढावा

गडचिरोली : ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या योजनेअंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या वृक्ष लागवडीच्या कामाची माहिती तात्काळ गुगल शीटवर अद्ययावत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले आहेत. तसेच, या कामासाठी नोडल अधिकारी नेमून जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी पंडा यांनी नियोजन भवनात आयोजित केलेल्या बैठकीत जिल्ह्याला दिलेल्या एक कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाचा आढावा घेतला. या वर्षी ४० लाख वृक्ष लागवड केली जात असून, पुढील वर्षीसाठी ६० लाख वृक्ष लागवडीचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. लागवडीनंतर केवळ वृक्ष लावणे महत्त्वाचे नसून, त्यांचे जतन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, वृक्षांची वाढ होईपर्यंत त्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. या कामात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. पुढील वर्षी लागणाऱ्या ६० लाख रोपांची सध्याच्या रोपवाटिकांमधील तयारीचाही त्यांनी आढावा घेतला.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक गोकूल, उपवनसंरक्षक श्रीमती आर्या, सहाय्यक जिल्हाधिकारी रणजित यादव, रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांच्यासह सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button