गडचिरोलीविदर्भ

जागतिक आदिवासी दिनानिमित्त गडचिरोलीत भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेद्वारे ९ ऑगस्ट रोजी होणार स्पर्धा

गडचिरोली : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली, यांच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी गडचिरोली शहरात भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले आहे.

मुलांसाठी: ५ किलोमीटरची ही स्पर्धा इंदिरा गांधी चौक ते न्यायालयीन परिसरात होणार आहे. मुलींसाठी: ३ किलोमीटरची स्पर्धा इंदिरा गांधी चौक ते आय.टी.आय. चौकापर्यंत घेण्यात येईल. या स्पर्धेसाठी सकाळी ६ वाजता सहभागी होण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे.

स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. मुलांसाठी प्रथम बक्षीस ७,००० रुपये, द्वितीय ६,००० रुपये, तृतीय ५,००० रुपये, चतुर्थ ४,००० रुपये, पाचवे ३,००० रुपये आणि सहावे २,००० रुपये आहे. मुलींसाठी प्रथम बक्षीस ५,००० रुपये, द्वितीय ४,००० रुपये, तृतीय ३,००० रुपये, चतुर्थ २,००० रुपये आणि पाचवे १,००० रुपये आहे. याव्यतिरिक्त, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुला-मुलींसाठी पाच प्रोत्साहनपर बक्षिसे (प्रत्येकी ५०० रुपये) देखील ठेवण्यात आली आहेत.

डॉ. होळी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तरुणांना या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button