
डॉ. देवराव होळी यांनी दाखवली हिरवी झेंडी; विजेत्यांना रोख बक्षीसे
गडचिरोली : जागतिक आदिवासी दिनानिमित्त गडचिरोली शहरात शनिवारी (दि.९) उत्साहाचे वातावरण होते. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली, यांच्या वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शेकडो युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग घेत स्पर्धेला उत्तम प्रतिसाद दिला.
मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात सकाळी ७ वाजता इंदिरा गांधी चौकातून झाली. आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी आणि कर्नल विक्रम मेहता यांनी स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
मुलांसाठी ५ किलोमीटरचे अंतर (इंदिरा गांधी चौक ते न्यायालयीन चौक), मुलींसाठी ३ किलोमीटरचे अंतर (इंदिरा गांधी चौक ते आयटीआय चौक) हे अंतर पार करण्यासाठी स्पर्धकांनी धाव घेतली. या स्पर्धेत मुलांमधून निखार भल्लावी (प्रथम), अखिल जाधव (द्वितीय), निखिल टेंभुर्णी (तृतीय), रोहन भुरसे (चतुर्थ), अभिषेक बावणे (पाचवा), तर सहावा क्रमांक यश भांडेकर यांनी पटकाविला. तसेच मुलींमधून रुचिरा नगरकर (प्रथम), साक्षी पोलोजवार (द्वितीय), लक्ष्मी पुंगाटी (तृतीय), श्रुती आदे (चतुर्थ), व पाचवा क्रमांक गायत्री धूळसे यांनी पटकाविला.

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ देवराव होळी, कर्नल विक्रम मेहता, जिल्हा क्रीडा अधिकारी बडकेलवार यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी माजी सभापती मारोतराव इचोडकर, महिला जिल्हाध्यक्षा पुष्पलता कुमरे, वामन जुनघरे, पवन गेडाम, कृ.उ.बा.स. संचालक हेमंत बोरकुटे, डॉ. मनोहर मडावी, उमेश उईके, सूरज मडावी, प्रदीप कुलसंगे, प्रियदर्शन मडावी, कुणाल कोवे, देवेंद्र राणे, आरती कोल्हे, रोहिणी मसराम, विद्या दुग्गा, मालता पुडो, स्मिता नैताम, प्रणय वालको, लीना कोकोडे, विनोद मडावी आदी उपस्थित होते.



