गडचिरोलीविदर्भ

गडचिरोलीत ‘निरंकारी महिला संत समागम’ उत्साहात संपन्न

हजारो महिलांचा सहभाग, सद्गुरूंच्या कृपेने आनंदी जीवनावर मार्गदर्शन

गडचिरोली : येथील संस्कृती सांस्कृतिक भवन, आरमोरी रोड येथे झोनस्तरीय निरंकारी महिला संत समागम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात गडचिरोलीसह गोंदिया, चंद्रपूर, वडसा, आरमोरी, चामोर्शी आणि इतर परिसरातील हजारो महिला भाविकांनी भक्तीमय वातावरणात सहभाग घेतला. या समागमात सर्व प्रस्तुती आणि व्यवस्थापनाची जबाबदारी महिलांनीच यशस्वीपणे सांभाळली.

या कार्यक्रमात संभाजीनगर येथून आलेल्या सिया अधाने यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त झालेल्या ‘ब्रम्हज्ञाना’मुळे जीवन कसे सहज आणि आनंदी होते, यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उपस्थित महिलांनी भजन आणि प्रवचनाद्वारे आपले विचार व्यक्त केले.

यावेळी माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, गिता हिंगे, अनिता मडावी, श्रीगोविंद सारडा, सदानंद कुथे, रमेश भरसे, अनिल कुनघाडकर, मधुकर भांडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. निरंकारी सेवादलाच्या महिला व पुरुषांनी समागमासाठी उत्तम व्यवस्था केली होती. सर्वांसाठी महाप्रसादाचीही सोय करण्यात आली होती. समागमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक शाखेच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. याबद्दल झोनल इंचार्ज किशन नागदवे आणि गडचिरोली शाखेचे प्रमुख गजानन तुनकलवार यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button