गडचिरोलीविदर्भ

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भव्य तिरंगा सायकल रॅलीचे आयोजन

देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमले शहर; विद्यार्थी, नागरिक आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

गडचिरोली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेला गडचिरोली शहरात यंदाही जोरदार प्रतिसाद मिळत आहे. लोकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी आणि राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने नगर परिषदेने शहरात एका भव्य तिरंगा सायकल रॅलीचे आयोजन केले.

मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह, इंदिरा गांधी चौक येथून या रॅलीची सुरुवात झाली. हातात तिरंगा घेऊन आणि देशभक्तीपर घोषणा देत ही रॅली शहरातील मुख्य मार्गावरून निघाली, ज्यामुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले. या रॅलीत नगर परिषदेचे कर्मचारी, विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी व प्राध्यापक, सायकल स्नेही मंडळ, क्रीडापटू, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

या रॅलीचा समारोप एकता पार्क येथे झाला. या ठिकाणी सहभागींसाठी एक छोटा देशभक्तीपर कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. या उपक्रमामुळे गडचिरोली शहरातील ‘हर घर तिरंगा’ अभियानाला अधिक बळ मिळाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button