गडचिरोलीविदर्भ

आदर्श पदवी महाविद्यालयाच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ रॅलीचे आयोजन

गडचिरोली : राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय यांच्या निर्देशनुसार गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत आदर्श पदवी महाविद्यालयाच्या वतीने “हर घर तिरंगा” रॅली १३ ऑगस्ट रोजी, सकाळी ११ वाजता विद्यापीठ परिसरातून उत्साहात प्रारंभ झाली.

विद्यार्थ्यांनी “भारत माता की जय”, “हर घर तिरंगा… घर घर तिरंगा” अशा जोशपूर्ण घोषणा देत परिसर देशभक्तीच्या वातावरणाने रंगवला. प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन करत, राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

रॅली विद्यापीठ परिसरातून कलेक्टर कार्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालय  जिल्हा सत्र न्यायालय या मार्गाने मार्गक्रमण करत निघाली. रॅलीचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या मनात देशसेवेची भावना जागृत करणे आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणे हे होते.

या प्रसंगी प्राचार्य डॉ. श्याम खंडारे, कार्यक्रम अधिकारी प्रा. अंतबोध बोरकर (रा.से.यो), प्रा. मनिषा पिपरे, सुदर्शन जानकी, प्रा. प्रणिता चंदनखेडे, प्रा. अजय राठोड, प्रा. नितीन चौधरी, प्रा. ऋतिक कोहळे, प्रा. मंगेश कडते, प्रा. पंकज राऊत, प्रा. मनोज बिरहारी, प्रवीण गिरडकर यांसह कर्मचारीवृंद व विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. रॅलीत तरुणाईचा जोश, राष्ट्रप्रेमाचा संदेश आणि तिरंग्याची शान यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button