स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यात ‘तंबाखूमुक्तीची शपथ’; मुक्तिपथचा अभिनव उपक्रम

शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्ये व्यसनमुक्तीचा संकल्प
गडचिरोली : देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात ‘मुक्तिपथ’ या संस्थेने एक स्तुत्य उपक्रम राबवला. स्वातंत्र्यदिनी शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहणानंतर अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली. या मोहिमेला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळाला.
आरमोरी नगरपरिषद कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तंबाखूमुक्तीचा संकल्प घेतला. तहसील कार्यालय आरमोरी येथे तहसीलदार उषा चौधरी यांनी तंबाखूमुक्त प्रतिज्ञा उपस्थितांना दिली. यावेळी आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के. व्ही. गवते, नायब तहसीलदार दोनाळकर, वाकुडकर, लाडे व इतर पदाधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. भामरागड येथील जिप समुह निवासी शाळा, लोक बिरादरी विद्यालय, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या शाळांमधील विद्यार्थ्यांनी तंबाखुमुक्तिची शपथ घेतली तसेहच आदिवासी विकास प्रकल्प, पंचायत समिती, तहसील कार्यालयात तंबाखूमुक्तीची शपथ घेत व्यसनमुक्त राहण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला.
एटापल्ली येथील भगवंतराव महाविद्यालय तसेच पंदेवाही शाळेत तंबाखूमुक्तीची शपथ घेण्यात आली. धानोरा तालुक्यातील माळंदा येथील पेरसापेन हायस्कूल, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे तंबाखूमुक्त संकल्प घेण्यात आला. धानोरा नगरपंचायत, तहसिल कार्यालय, उच्च प्राथमिक शाळेत तंबाखू संकल्प शपथ देण्यात आले. चामोर्शी तहसील कार्यालय, पंचायत समिती येथे तंबाखू मुक्त्त प्रतिज्ञा घेण्यात आली तसेच शिवाजी हायस्कुल, जि.प. कन्या शाळा येथे पोलिस स्टेशन व मुक्तीपथच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्त्त संकल्प रॅली काढण्यात आली. सिरोंचा तहसील कार्यालय आणि जिल्हा परिषद हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी तंबाखू मुक्त शाळा करण्याची शपथ घेतली.
अहेरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आलापल्ली, नागेपल्ली, इंदाराम, ग्राम पंचायत आलापल्ली, क्रीडा संकुल आलापल्ली, ग्राम पंचायत नागेपल्ली येथे तबांखु मुक्त शपथ घेण्यात आली. तहसील कार्यालय मूलचेरा येथे ७९ व्या स्वातंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण नंतर स्वतः चेतन पाटील तहसीलदार यांनी उपस्थितांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली. तसेच पंचायत समिती मूलचेरा येथे सुद्धा तंबाखूमुक्तीची शपथ घेण्यात आली.
हा उपक्रम गडचिरोली जिल्ह्याला व्यसनमुक्त बनवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरला आहे. स्वातंत्र्यदिनी व्यसनमुक्तीचा संकल्प घेतल्याने या कार्यक्रमाला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.



