
मोहगाव ग्रामसभेत निर्णय
कुरखेडा : तालुक्यातील मोहगाव येथे मोहगाव व वाकडी येथील ग्रामस्थांची सभा पोलिस व मुक्तीपथ तालुका टीमच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी अवैध दारूविक्रीमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर विचारमंथन करून दोन्ही गावांमध्ये दारूविक्रीबंदीचा ठराव पारित करण्यात आला. या निर्णयाची कठोर अंमलबजावणी व्हावी, याकरिता दारूविक्री करताना आढळून आल्यास दंडासह शासकीय योजनापासून वंचित ठेवणाचे ठरविण्यात आले तसेच दारूविक्रीबाबतची माहिती देणाऱ्यास २ हजारांचे बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आले आहे.
मोहगाव येथे किशोर धोंडने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेत सचिव आर. जी. दिहारे, पोलीस पाटील विजय तुलावी, माजी सरपंच अरुण उईके, सुरेश वालदे, यशवंत ऊइके, अनिल उईके, दुर्योधन ऊइके, पुंडलिक उईके, मोतीराम ऊइके, राजू मेश्राम, दुर्योधन कचलाम, प्रकाश किरंगे, विनोद कचलाम, किशोर कागदे, हेमराज धोंडने, किशोर टेंभुर्णे, संदेश कोटंगले, गीताबाई किरंगे, शीला आत्राम, वर्षा टेम्भूर्णे, सावित्रा नैताम, दमयंती नैताम, ललिता उईके, कमलाबाई उईके, लिलाबाई उईके, दर्शना कचलाम, छायाबाई कचलाम, भाग्रता कचलांम, सुनिता किरंगे, काशिनाथ उइके, यशवंत मेश्राम यांच्यासह मोहगाव, वाकडी ग्रामस्थ, ग्रामपंचायत समिती, पोलीस विभाग व मुक्तीपत टीम उपस्थित होती.
सदर ग्रामसभेमध्ये सर्वानुमते दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला. गावात कोणत्याही व्यक्तीने दारू विक्री केल्यास दहा हजार रुपये दंड व वारंवार विक्री केल्यास दंड वाढत जाईल. दारू विक्रीची माहिती दिल्यास व दारू पकडून दिल्यास दोन हजार रुपये बक्षीस, दारू पिऊन सामाजिक कार्यात अडथळा आणल्यास किंवा घरी पत्नीला मारहाण व शिवीगाळ केल्यास किंवा दारूबंदी समितीला शिवीगाळ केल्यास पाच हजार रुपये दंड असा सर्वानुमते ठराव घेण्यात आला. दारू विक्रेत्यांना ग्रामपंचायत तर्फे शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही. राशन देता येणार नाही, असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे.



