
गडचिरोली : लोककवी वामनदादा कर्डक यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी लोककवी वामनदादा कर्डक यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, लॉयड मेटल्सचे निवासी संचालक कर्नल विक्रम मेहता, अधिष्ठाता मानवविज्ञान विद्या शाखा डॉ. श्याम खंडारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रविण पोटदुखे, वित्त व लेखाधिकारी सी ए भास्कर पठारे, न. न. व. सा. चे संचालक डॉ. मनीष उत्तरवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता विद्यापीठामध्ये डॉ. विजय राठोड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती लोककवी वामनदादा कर्डक अध्ययनाचे समन्वयक रोहित बापू कांबळे यांनी दिली. याप्रसंगी प्राध्यापक, अधिकारी, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोककवी वामनदादा कर्डक अध्ययनाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.



